आळंदी देवाची येथील युवती बेपत्ता


लोकनेता न्यूज नेटवर्क

फुलगाव (गौतम पाटोळे) :- घरात कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून एक १८ वर्षाची युवती बेपत्ता झाली असल्याची माहिती आळंदी पोलीसांनी दिली.

युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद युनुस नवाज पठाण (वय ४०) रा. बोल्हाईनगर, चऱ्होली खुर्द रोड,आळंदी देवाची) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली.

बेपत्ता झालेल्या युवतीचे वर्णन पुढील प्रमाणे वय १८ वर्ष ४महिने,रंग सावळा,उंची ५ फुट,बांधा सडपातळ,अंगामध्ये काळया रंगाचे लेगीन्स व राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.गळ्यात चांदीची चेन,कानात नकली बाळी,उजव्या हातात चांदीची अंगठी,पायात चप्पल असे तिचे वर्णन आहे.

वरील वर्णनाची युवती कोणाला आढळल्यास आळंदी पोलीस ठाणे,पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालय,आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे येथे संपर्क साधावा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी. एस.नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्री.रघुनाथ तिटकारे हे करीत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments