लोकनेता न्युज नेटवर्क
बिलोली (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.सर्वजातीधर्मांचा विचार करणारा पक्ष असून राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बिलोली शहराच्या विकासा सोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत.गेल्या दोन वर्षांच्या काळात अजित पवार यांच्या मार्फत गेल्या दोन वर्षांच्या काळात अल्पसंख्याक समाजाला सर्वाधिक निधी मिळाला असून बिलोली नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास आमच्या वचनामतील सर्व कामे करण्यास आम्ही तत्पर आहोत.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.ते काल दि.26 नोव्हेंबर रोजी बिलोली नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने शहरातील गांधी चौक येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकनकर,माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी आमदार मोहन हांबर्डे, सुभाष साबणे, अविनाश घाटे, प्रदेश उपाध्यक्षा मिनलताई पा खतगावकर, जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, यांच्यासह बिलोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंद्रजित तुडमे, कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल कुडमुलवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काॅग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदांचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार सभेस संबोधित करताना माजी मंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत आजपर्यंत काँग्रेसने वारंवार मुस्लिम समाजाचे मत घेण्याचे काम केले पण मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्याचे सांगून राष्ट्रवादीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. तर महिलांना सक्षम बनविण्यासाठी राज्यात लाडकी बहिण,लेक लाडकी अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत.नांदेड मध्ये आल्यापासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याने महिला सन्मान, मातृशक्तीचा सन्मान केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महिला भगिनींनी राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केले. या सभेस माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर,माजी आमदार सुभाष साबणे, श्रुती तुडमे, माधवराव अंकोशकर यादींनी संबोधित केले.तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंद्रजित तुडमे यांनी शहराच्या विकासासाठी मी व आमचे सर्व उमेदवार चोवीस तास उपलब्ध राहुन बिलोली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील शेकड माता-भगिनींनसह नागरिकांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment