अखेर वनविभागाने कालु वाघाला कले जेरबंद


लोकनेता न्यूज नेटवर्क

चंद्रपूर (ज्ञानेश्वर जुमनाके) :- वन विभागाने चारही बाजूने वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी दिवस-रात्र परिश्रम करीत होते. सोमवारी रात्री त्या नरभक्ष बाधाला पकडण्यात वन विभागाला यश आले. वाघाला जेरबंद केल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र अजूनही या परिसरात काही वाघाची दहशत कायम असून जंगलव्याप्त परीसरातील 

शेतकयांना आपला जीव मुठीत घेऊन शेताच्या कामावर जावं लागत आहे. 

माणव -वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने तत्परतेने पाऊले उचलणे गरजेचे आहे,

जंगलव्याप्त परिसरातून रेती चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, रात्रौच्या दरम्यान अवैधरित्या रेती चोरणाय्रा टक्टरच्या आवाजाने जंगलातील प्राणी आपला अधिवास सोडून परिसरातील शेतशीवारात वन्यप्राण्यांनी शिरकाव केल्याने शेतकय्रांना वाघ आपले भक्ष बनवित असल्याची चर्चा नागरीकात होत आहे.

तरी वनविभागाने, आणि महसूल विभागाने जंगलव्याप्त परिसरातून होत असलेल्या रेती चोरांच्या मुसक्या आवळाव्या जणेंकरून माणव -वन्यप्राणी संघर्ष होणार नाही? दुसरीकडे गौण खनिज संपत्तीची चोरी होणार नाही असे परिसरात बोलले जात आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments