नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा कडे इच्छुकांची मोठी गर्दी.


लोकनेता न्यूज नेटवर्क

अहमदपूर (तानाजी मारकवाड) :- अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुक लढवण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज बैठकीत दिसून आले. 

अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंपा समोरील भाजपा चे शहराध्यक्ष अॅड अमित रेड्डी यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेले प्रभारी बसवराज पाटील कौळखेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. महायुती मधुन लढायचे की स्वंतत्र लढायचे यावर सदरील बैठकीत विचार मंथन करण्यात आले. 

इच्छुक उमेदवारांच्या भावना पक्ष श्रेष्ठीनां लेखी स्वरूपात देणार असून महायुती मधुन की स्वंतत्र लढायचे यावर श्रेष्ठीचा लवकरच आदेश प्राप्त होईल तो पर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागण्याची अहवान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अहमदपूर नगर परिषद निवडणुक प्रभारी बसवराज पाटील कौळखेडकर यांनी केले आहे. 

सदरील बैठकीत माजी नगराध्यक्ष अॅड. भारत चामे, माजी सभापती अशोक काका केंद्रे, राजकुमार मजगे, गणेश दादा हाके पाटील, बालाजी गव्हाने,शहराध्यक्ष अॅड अमित रेड्डी, ज्ञानोबा बडगिरे, स्वयंप्रकाश हंगे, प्रताप पाटील, बबलू पठाण, ओम पुणे, रामनंद पलमटे , यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. 

बैठकीचे प्रास्ताविक गोविंद गिरी यांनी करून अहमदपूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची माहिती यावेळी गोविंद गिरी यांनी बैठकीत दिली. 

 अॅड.अमित रेड्डी,डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी, डॉ. निलेश मजगे, अॅड. स्वप्नील व्हते, जिवण गायकवाड, अरुण वाघबंर,अॅड.निखील कासनाळे,गजानन मुंडे, मन्नान शेख, ओमकार पुणे, प्रणिता बेंबळे,जगन्नाथ मामडगे अदिसह अनेक इच्छुक उमेदवारांनी महायुती की स्वतंत्र निवडणुक लढवण्या संदर्भात बैठकीत आपली मते मांडली.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments