श्री. गणपतभाऊ कांबळे यांचे निधन.


लोकनेता न्यूज नेटवर्क

फुलगाव (गौतम पाटोळे) :- धानोरे ( ता खेड ) जि पुणे या गावातील सामाजीक कार्यकर्ते,आदर्श सुपुत्र श्री गणपत मारुती कांबळे ( वय ७६ ) यांचे मंगळवार दि.११नोव्हेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,दोन मुले,सुना,चार मुली,आई,तीन भाऊ,वहिनी,पुतणे,बहीण,पुतण्या,जावई,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार गौतम संभाजी पाटोळे यांचे ते मावस भाऊ होत.श्री.गणपत भाऊ कांबळे यांच्या पार्थीव देहावर पवित्र इंद्रायणी नदीकाठी धानोरे ता.खेड जि.पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजीक, धार्मीक,राजकीय,कला, क्रिडा,कृषी,सहकार,व्यापार, क्षेत्रातील मान्यवर,धानोरे गावातील सर्व आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक,धानोरे ग्रामस्थ युवक,ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री.गणपतभाऊ कांबळे यांनी अनेक वर्ष थेरगाव ,( चिंचवड) येथे प्रामाणिक पणे नोकरी केली.मुलांना,मुलींना नातवांना आदर्श संस्कार दिले श्री.गणपतभाऊ कांबळे यांचा मनमिळाऊ,शांत स्वभाव होता.त्यांच्या निधनामुळे धानोरे ग्रामस्थांनी,मित्र मंडळींनी हळहळ व्यक्त केली. कै.गणपत मारुती कांबळे यांचा जलदानविधी कार्यक्रम रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ,धानोरे गाव ता.खेड जि.पुणे येथे होणार आहे.या कार्यक्रमसाठी धानोरे परिसरातील ग्रामस्थ,श्री.कांबळे परिवाराचे सर्व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.कांबळे परिवार धानोरे यांनी केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments