हिंगोली–नांदेड रस्त्यावर सिमेंट बॅरिकेटमुळे अपघातांची मालिका...! नागरिकांचा संताप



लोकनेता न्युज नेटवर्क

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- अर्धापूर शहरातील पूर्व वळण रस्त्यावर हिंगोलीकडून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सिमेंटच्या बॅरिकेट बसवण्यात आल्या आहेत.मात्र या बॅरिकेट रस्त्याच्या मध्यभागी असल्याने अनेक वाहनचालकांचा संतुलन बिघडून अपघात घडत आहेत.त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन ही बॅरिकेट हटवावीत,अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरू लागली आहे.

हिंगोली–नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने रस्ता आता गुळगुळीत आणि सरळ झाला आहे.त्यामुळे वाहनांचा वेग स्वाभाविकच वाढला आहे.परंतु रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा झगमगता प्रकाश थेट डोळ्यांवर पडल्याने रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेट दिसत नाहीत. परिणामी चालकांना दिशा बदलण्यास विलंब होतो आणि थेट बॅरिकेटवर धडक होऊन गंभीर अपघात घडतात.

या धोकादायक व्यवस्थेबाबत वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.हे बॅरिकेट काढले नाहीत तर आणखी जीव जाण्याची शक्यता आहे,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

रात्रीच्या काळोखात परावर्तन होणाऱ्या या सिमेंट बॅरिकेटमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व पत्करावे लागले आहे.

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत गंभीर असून,संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करूनयैथे वसमतफाटा येथे बॅरिकेट लावल्या जनतेस त्रासदायक होत आहे जेतेतुन बोलले जात आहे रस्ता मोकळा करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments