माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अलंकापुरीत प्रारंभ


लोकनेता न्यूज नेटवर्क

आळंदी देवाची (इम्रान हकीम) :- आळंदी येथील श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत तसेच श्रींचे ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षातील ७३० व्या श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास श्री. गुरू हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने हरिनाम गजरात वारकरी संप्रदायातील प्रथापरंपरांचे पालन करीत वीणा, टाळ, मृदंगाचा त्रिनादात श्रीक्षेत्रोपाध्ये वेदमूर्ती ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्र जयघोषात आळंदी कार्तिकी यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी श्रींचे पायरी पूजन प्रसंगी श्रींचे पुजारी अमोल गांधी, पुजारी काका कुलकर्णी यांनी वेदमंत्र जयघोष करीत पौरोहित्य केले. 

याप्रसंगी श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी मालक राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब , डॉ. भारत देखणे, विधीतज्ञ राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटिल, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विधीतज्ञ विष्णु तापकीर, नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, सेवक चोपदार, बाळासाहेब रणदिवे, श्रींचे मानकरी बाळासाहेब उर्फ योगीराज स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आळंदी शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर गुळुंजकर , विठ्ठल घुंडरे, भीमाजी घुंडरे पाटील, माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, भाजपचे संकेत वाघमारे यांचे सह आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी, भाविक, दिंडीकरी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments