व्हाइस ऑफ मिडियाची बिलोलीत तालुका कार्यकारिणी जाहीर...!



लोकनेता न्युज नेटवर्क

बिलोली (नबाजी कुडकेकर) :- ६ नोव्हेंबर रोजी, बुधवारी, बिलोली तालुक्यातील विजयकुमार कुंचणवार यांच्या मंगल कार्यालय येथे व्हॉइस ऑफ मिडिया ,या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ गणेश जोशी आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी पत्रकार संजयकुमार पोवाडे यांची बिलोली तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर वैभव घाटे आणि डॉ. सोपान गारे यांची उपाध्यक्ष, तर नबाजी कुडकेकर सचिवपदी व गौतम सोनकांबळे सहसचिव, अ‍ॅड. नागार्जुन सोनकांबळे कोषाध्यक्ष , गंगाधर शिंदे सहकोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमात मान्यवरांनी व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेचे उद्दिष्ट आणि पत्रकारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याची दिशा बाबतीत सखोल माहिती दिली.

यावेळी सन्मान सोहळ्यात जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ गणेश जोशी यांचा सत्कार संजयकुमार बिलोलीकर व नबाजी कुडकेकर यांनी केला. कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांचा सत्कार डॉ. सोपान गारे आणि सुरज कांबळे यांनी केला. तसेच इतर मान्यवरांमध्ये एस.एम. मुदखेडकर, प्रकाश हानवते, बालाजी नागठाणे, करीम चाउस, शिवाजी कुंटुरकर आणि प्रल्हाद भालेराव यांचा विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष संजयकुमार पोवाडे, सचिव नबाजी कुडकेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात पत्रकार एकतेचे महत्व आणि स्वच्छ व निर्भीड पत्रकारितेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हानमंते यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम सोनकांबळे यांनी मानले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments