लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोली ( संतोष कदम) :- वाघोलीतील प्रसिद्ध असलेले समाधान पोहे च्या दुसऱ्या शाखेचे एक नोव्हेंबर रोजी उद्घाटन विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले.
वाघोली परिसरात समाधान पोहे नावाचा ब्रँड खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. पोहे, उपमा, शिरा आणि साबुदाणा खिचडी इत्यादी पदार्थ रुचकर व चविष्ट पदार्थ खवय्यांसाठी समाधान नावाप्रमाणे खवय्यांच्या मनाला समाधान देऊन जातात अशा प्रतिक्रिया कित्येक खवय्यांनी दिल्या.
समाधान हॉटेल च्या सुरुवातीच्या काळात अतिशय कमी भांडवलात सुरू केलेला समाधान ब्रँड आता एक मोठा व्यवसाय होण्यामागे आदित्य कांबळे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे अपार कष्ट आणि मेहनत आहे.
ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने समाधान हॉटेल चे मालक आदित्य कांबळे यांनी मनोमन त्यांचे आभार मांडले.
या सोहळ्यास आमदार माऊली आबा कटके, हिराभाऊ वाघमारे,बाळासाहेब सातव सर, मारुती आण्णा गाडे, संतोष दादा सातव ,सुमित गाडे, संपत आबा गाडे, किशोर राजगुरू सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व त्यावेळी पत्रकार जितेंद्र आव्हाळे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
चौकट
आमदारांनी केले तोंडभरून कौतुक
अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन दोघा भावांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणे व नम्रता जपत आपला व्यवसाय वाढवला. व्यवसायाच्या माध्यमातून कसं पुढं येऊ शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे दोघे भाऊ. येणाऱ्या काळात हे दोन्ही भाऊ व्यवसायाच्या माध्यमातून नाव लौकिक करतील.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment