अहिल्यानगर (ज्ञानेश्वर बुधवत) :- दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी, जय भगवान प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय “कार्यगौरव पुरस्कार सोहळा २०२५” भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. या सोहळ्यात दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश ला सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “कार्यगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ, समाजसेवक व भारतरत्न पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
या गौरवशाली क्षणी दैवत फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्यवर्ग उपस्थित राहून संस्थेचा मान वाढविला. हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठेचा, समाजसेवेच्या वृत्तीचा आणि एकजुटीच्या बळाचा परिणाम आहे.
संघटनेची सुरुवात काही तरुण आणि ऊर्जावान युवकांच्या सामाजिक जाणिवेतून झाली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, तसेच सामाजिक ऐक्य आणि न्यायासाठी सतत कार्यरत राहणे हेच दैवत फाऊंडेशनचे ध्येय आहे. आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी मदतकार्य, पुरस्कार सोहळे, समाजभूषण सन्मान, आणि युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
हा पुरस्कार आपली एकजूट, परिश्रम आणि समाजातील विश्वास यांचे फलित आहे. आगामी काळात संघटना आणखी जोमाने कार्य करत राहील आणि समाजपरिवर्तनाच्या दिशेने पुढे जाईल, असा निर्धार सर्व पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यगौरव पुरस्काराचे श्रेय दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि समर्थक वर्ग यांना समर्पित.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment