लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोली (संतोष कदम) :- वाघोली परिसरात मोबाईल फोन हरवल्याच्या व चोरी गेल्याच्या तक्रारी अनेकांच्या येत असतात त्या वेळी मदत म्हणुन पोलिस स्टेशन महत्त्वाची भूमिका बजावत असते.
मा. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे हरवलेले जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेणे कामी युनिट ६ कडील पोलीस हवालदार सारंग दळे व महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सीईआयआर पोर्टलवरील माहिती संकलित केली. संगणक विभागाचे महिला पोलीस अंमलदार तरंगे यांचे मदतीने मिसिंग मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून वाघोली पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे हद्दीतील हरविलेले वेगवेगळया कंपनीचे अंदाजे ५,११,०००/-रु. किंमतीचे एकूण २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. सदरचे मोबाईल फोन हे त्यांचे मुळ मालकास परत देण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण गुन्हे शाखा युनिट-६ यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment