विद्यानिकेतनचा पुण्यात दिमाखदार मेळावा शिक्षणमंत्री भुसे झाले प्रभावित




लोकनेता न्युज नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी) :- माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून 1966 साली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले शासकीय विद्यानिकेतन आज देशा-परदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय कार्याने शाळेचे नाव जगभर पोहोचवले असून, याचा आपल्याला अभिमान आहे, अशा गौरवोदगार राज्याचे वर्तमान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात आयोजित पाचही विद्यानिकेतच्या महामेळाव्यात व्यक्त केले.

(चौकटीतील मजकूर)
--------------------------------
यावेळी धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांना “विद्यानिकेतन रत्न” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या पुरस्कारांची संख्या आता 104 वर पोहोचल्याने समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

--------------------------------

या महामेळाव्यासाठी राज्यभरातून तसेच देश-परदेशातून सुमारे 2,000 माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणमंत्री 
भुसे म्हणाले, “ज्या शाळेने आपल्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि यश दिले, त्या शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेला हातभार लावण्यासाठी ‘गिव्ह बॅक फाउंडेशन’ ही संकल्पना अत्यंत प्रशंसनीय आहे.”राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांची सशक्त संघटना उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यानिकेतनच्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्र, व्यापार-उद्योग, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करत शाळेची प्रतिष्ठा उंचावली आहे.मेळाव्यात माजी प्राचार्य दिलीप गोगटे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, मा. खा. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आ. शिरीष कुमार नाईक, आ. सुनील भुसारा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

“जगलो विद्यानिकेतन – जगवले विद्यानिकेतन”,
“विद्यानिकेतनाचे दिवंगत तारे”,“बंधन जोडणारे हात”,
“रत्न घडवणारे हात”या अद्वितीय संकल्पनांनी तीन दिवस संपूर्ण मेळावा अविस्मरणीय बनवला.दिलीप ठाकूर,डॉ. दिलीप पुंडे, कॅप्टन नीलकंठ केसरी, बाजीराव खांदवे, नवनाथ वाठ,ब्रिजकिशोर झंवर,गिरीश आरेकर, डॉ. चंद्रकांत,रामलाल पवार, प्रदीप लोखंडे, केशव काळे, बापू कदम, डॉ. भगवान केंद्रे, प्रभाकर वाघमारे, सुदर्शन मेहकरे, भानुदास बिरादार, सतीश मांडवकर, प्रमोद सुवर्णनकार, सुदर्शन अनघडे,रमेंद्र जोशी, किशोर घराते यांच्यासह प्रत्येक बॅच मधील एका विद्यार्थ्यांला “विद्यानिकेतनीय रत्न”पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात 18 ते 70 वर्षे वयोगटातील माजी विद्यार्थ्यांनी गाणी, विनोद, नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गोरखनाथ कांबळे यांचा बाहुल्यांचे नृत्य सर्वांना आवडले.शारीरिक शिक्षणाच्या वर्गात सहभाग घेऊन शालेय आठवणी जागविल्या.सुप्रसिद्ध सिने-नृत्य दिग्दर्शक दिलीप खंडेराय आणि त्यांच्या संचाचा “महाराष्ट्राची लोकधारा” हा विशेष कार्यक्रम भरभरून दाद मिळवून गेला.

राहुल भोसले यांच्यासह पंकज वेंदे, गोपाळ काळे,दिलीप ठाकूर , विजय ठुबे, अतुल कुलकर्णी, दगडू वेंदे,श्रीकांत कुलांगे,राजेंद्र गिल, अशोक सातव,लक्ष्मीकांत देशमुख, मुजफ्फर सय्यद,भरत तांबोळकर, शामराव घोरपडे,छगन नेरकर, योगेश उघडे ,डॉ. संजय पवार, मोहन सांयकाळ यांनी अथक परिश्रम घेऊन महामेळावा भव्य आणि संस्मरणीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.शासकीय विद्यानिकेतनचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यानी तात्काळ एक व्यापक बैठकीचे मंत्रालयात बोलाविल्यामुळे महामेळाव्याची फलश्रुती झाल्याबद्दल विद्यानिकेतनीय परिवारातून राहुल भोसले व टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहॆ. आगामी महामेळावा 2027 मध्ये नांदेड येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा दिलीप ठाकूर यांनी केली आहे .
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments