हिमायतनगरच्या नगरपंचायत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा --- उपनिरीक्षक शेख साहेब


लोकनेता न्युज नेटवर्क

हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- निवडणुकीच्या अनुषंगाने गावोगावी त्यांना कनेक्ट करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता दिनांक. ४ नोव्हेंबर पासून चालू झाली असून हिमायतनगरमध्ये नगर पंचायत निवडणुकीची आचारसहिता लागू झाली असून ग्रामीण भागातील गावोगावी देखील निवडणुकीच्या काळामध्ये गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. गावात निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब यांनी केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी येथे दिनांक ९ -११-२०२५रोजी पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब यांनी भेट दिली.आणि बोलताना साहेबांनी असे सांगितले आहे की इलेक्शनच्या प्रियेडमध्ये गावातील तरुण पिढी किंवा नागरिकांनी मोबाईल मध्ये स्टेटस इंस्टाग्राम फेसबुक मध्ये कोणतीही कमेंट पोस्ट कुठल्या प्रकारचे स्टोरी रेल लावू नये जेनेकरुन लोकांच्या भावना दुखावतील तुमच्या चुकीमुळे गावाचे वातावरण खराब होईल म्हणून कोणीही असे करू नये संविधानाने दिलेली आदेशामुळे मतदान येतात जातात म्हणून मतदान म्हणजे फक्त मतभेद आहे त्यामध्ये मनभेद येऊ द्यायचा नाही असे शेवटी साहेबांनी सांगितले तसेच पत्रकार राम चिंतलवाड यांनी पोलीस डिपारमेंट चे आभार मानले आहे यावेळी बीट जमादार नागरगोजे साहेब पोलीस पठाण साहेब गावातील पोलीस पाटील अवधूत कदम सरपंच दयाळ गिरी तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत हाके माझी सरपंच प्रकाश हाके कृष्णा आंबेपवाड , युवा नेता राम गीरी आणि गावातील तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments