लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- स्वतःच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा दिव्यांगांनी एल्गार पुकारला आहे.
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबद्दल आणि कल्याणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे होय. यादिवशी अपंगत्वाशी संबंधित समस्यांबद्दल शिक्षण दिले जाते. त्यांच्यासमोरील आवाहनांची दखल घेतली जाते आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांच्या समावेशनाला प्रोत्साहन देत जागरूकता निर्माण करणे, हक्कांना प्रोत्साहन देणे,अडथळे दूर करणे, अधिकार आणि सन्मान वाढविणे हा या दिनाचे मुख्य उद्देश आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या कल्याणकारी योजना दिव्यांगांपर्यत पोहचविणे हा शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे आद्य कर्तव्य आहे परंतु ग्रामपंचायती.पंचायत समीत्या.जिल्हा परीषद. नगरपंचायती.नगरपालिका.महानगरपालिका.नियोजन विभाग. समाज कल्याण विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग.नगरपालिका प्रशासन विभाग. पंचायत विभाग, गृह पोलिस विभाग. पुरवठा विभाग. शिक्षण विभाग.घरकुल विभाग.यासह आमदार खासदार हे त्यांच्या कडील दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी तसेच वैयक्तिक लाभासाठी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांची अद्याप काटेकोरपणे अंमलबजावणी केली नसल्यामुळे तसेच मालपाणी मतीमंद व मुकबधीर शाळेतील गैरप्रकारासह जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह गुणवत्तेची चौकशी करून दिव्यांग शाळा संहिता २०१८ चे उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी सन २०१० पासुन शेकडोंच्या पार निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही अद्याप गेंड्याची कातडी धारण केलेल्या शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जाग आली नसल्यामुळे तसेच नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील दिव्यांग शाळा ह्या दिव्यांग शाळा संहिता २०१८ नुसार चालत नसल्याच्या निषेधार्थ सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये शेकडो दिव्यांगांचा महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्ती साठींचे दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ ची व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ व दिव्यांग शाळा संहिता २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आजवर शासन स्तरावरून दिव्यांगांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या सर्वच शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्हा परिषद नांदेड येथील बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी अधिकारी यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे. महसूल विभागातील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या व इतर विविध मागण्यांच्या अनुषंगाने ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये सकाळी १० वाजल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यासह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात. संस्थाचालक. लोकप्रतिनिधी यांच्या कार्यालयात.दालणात. घरासमोर, दिसेल त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढुन एकापेक्षा अनेक प्रकारचे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे तरी नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांनी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी सकाळी ठिक १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रेल्वे स्टेशन नांदेड समोर उपस्थित रहावे असे आवाहन राहुल साळवे यांच्यासह रवि कोकरे, व्यंकट कदम, प्रमोद मांजरमकर, सय्यद आतिक हुसेन, मुरलीधर जोगदंड,नागनाथ कामजळगे, सुनिल जाधव, लक्ष्मण जाधव. शिवराज बंगरवार, शिवाजी सुर्यवंशी, सय्यद आरिफ, कार्तिक भरतीपुरम, शेख उमर, प्रदिप हणवते.शेख आलीम. शेख सादिक, शेषेराव वाघमारे.आनंदा माने.शेख सिराज.विष्णु जायभाये.मोहसिन कादरी. संभाजी सोनाळे.भोजराज शिंदे.अजय गोरे.महाविर गायकवाड, शेख सादिक,राजु इराबत्तीन, शेख माजीद.गजेंद्र येमेकर. प्रकाश वाघमारे. लक्ष्मण पांचाळ. माधव हिवराळे.सईद वैद्यजी.शेख मतिन.परशुराम गायकवाड. सय्यद अफरोज मेहबूब. प्रशांत हणमंते. पिंटु राजेगोरे.नारायण नवले.वसिम मोहम्मद.किरणकुमार न्यालापल्ली.विकास साळवे.संजय धुळधाणी.सिद्धोधन गजभारे,मुंजाजी कावळे.राजेश फरकंडे.रमेश लंकाढाई.मिलिंद सितळे.गोपाल मुंगीकर.नागोराव कदम.नागेश निरडी.प्रल्हाद पोहरे.नारायण तांडलवार,शेख समदमीया.
भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते.सविता गवते.सरोजा निलावार.अफरोजा खानम, शेख जैनाज यासह मुकबधीर कर्णबधिर संघटना, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती व सकल दिव्यांग संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment