लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, सिंदखेड राजा येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान दिन' म्हणजेच ' राष्ट्रीय कायदा दिन ' मोठ्या उत्साहाने, शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.टी.मोरे सर यांनी भूषवले.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.एस.एम.भुतेकर सर व श्री.एस.टी.चौधरी सर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री . पी.एम.मापारी सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान पुस्तिका पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन घेण्यात आले..
त्यानंतर प्रमुख वक्ते श्री.पी.एम.मापारी सरांनी संविधानाचा परिचय, त्याचे महत्व, संविधानिक मूल्य, अधिकार व हक्क आणि आधुनिक भारतात त्याची गरज यावर मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री . एस.टी.मोरे सरांनी “देशाचा कारभार संविधानानुसार चालतो” या मूलभूत तत्त्वाची महत्त्वपूर्ण जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.चौधरी सरांनी केले.
याच निमित्ताने शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा
आणि इतर उपक्रम व काही स्पर्धांचे बक्षिस वितरण घेण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत कार्यक्रम रंगतदार आणि यशस्वी केला.
एकूणच, संविधान दिनाचा उत्सव आदर्श विद्यालयात ज्ञान, राष्ट्रप्रेम आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम ठरला.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment