किनगांव राजा | महेश मुंढे:- किनगांव राजा येथील ग्रामपंचायत मधील जेष्ठ महिला सदस्य अपर जिल्हाधिकारी यांच्या एका आदेशाने अपात्र ठरल्या आहेत.गांवातील एका शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिभा गणेशराव जाधव यांनी गांवातील मालमत्ता क्रमांक ९५४ वर अतिक्रमण केले होती.शासकीय अनुदानातुन व्यायाम शाळा उभारी होती, यासंदर्भात सुरुवातीला कोणीच आवाज उठविला नाही ऑक्टोबर २०२४ मध्ये गांवातील नागरीक शिवाजी काळुसे यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे संदर्भात आक्षेप घेतला होता.सदर शासकीय जागेवर शासकीय अनुदानातून युवकांसाठी उभारलेली व्यायाम शाळेमध्ये स्वतः अध्यक्ष असलेल्या वरद इंग्लिश खाजगी शाळा सुरू केली होती.
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध करणारे दस्तवेज शिवाजी काळुसे यांनी आपल्या अपिलात दाखल केले होते.अपर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात अनेक वेळा सुनावणी घेतली.प्रतिभा जाधव यांनी लोकप्रतिनिधींत्व कायंदाचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर व सुनावणीत पूढे आलेल्या साक्षी पुराव्याच्या
आधारावर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अंतिम आदेशात प्रतिभा गणेशराव जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविले आहे.
गांवतील युवकांसाठी तत्कालीन आमदार निधीतून व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात आले होते,त्यानंतर सदर व्यायाम शाळा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यामार्फत ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आली होती.व्यायाम शाळेत सद्या स्थितीत 'वरद इंग्लिश स्कूल' या नावाने शाळा सुरू असून सदर शाळेच्या अध्यक्षा प्रतिभा गणेशराव जाधव आहेत.युवकांना व्यायाम करण्यासाठी शासकीय निधीतून बांधण्यात आलेली असून सदर इमारतीचा वापर व्यायामाशिवाय अन्य कारणासाठी होत असल्याचे व ग्रामपंचायत च्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असल्याने सदरची इमारत ग्रामपंचायतने वरद इंग्लिश कडून ताब्यात घेऊन ती युवकांना व्यायाम करण्यासाठी खुली करण्याची कारवाई करणे आवश्यक आहे,असा अहवाल विस्तार अधिकारी सिंदखेड राजा यांनी दिला होता. त्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी प्रतिभा गणेशराव जाधव यांच्यावर सदर जागा खाली करण्या बाiबत नोटीस बजावली होती, व्यायाम शाळेवर अतिक्रमण असल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांनी काढला होता,प्रतिभा गणेशराव जाधव यांना मालकी हक्काचे पुरावे मागणी केली असता कुठल्याही पुरावे त्यांनी सादर केलेले नव्हते,प्रतिभा जाधव या संस्थेच्या जबाबदार पदावर असुन त्या सदर अतिक्रमणांस जबाबदार आहेत,असा निष्कर्ष अपर जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशामध्ये नमूद केले आहे त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा गणेशराव जाधव यांना अपात्र केले आहे.

Post a Comment