फुलगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. तुकाराम ( दादा ) साकोरे पाटील यांचे निधन

लोकनेता न्यूज नेटवर्क

फुलगाव | गौतम पाटोळे :- फुलगाव ( ता हवेली ) जि. पुणे या गावातील आदर्श सुपुत्र, प्रगतशील शेतकरी श्री. तुकाराम दगडू साकोरे पाटील ( वय ७५ ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. 

    त्यांच्या पार्थीव देहावर फुलगाव येथील पवित्र भीमा नदी काठी अंत्य संस्कार करण्यात आले यावेळी सामाजीक, धार्मीक, शैक्षणीक, राजकीय, कृषी, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, क्षेत्रातील मान्यवर फुलगाव परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, फुलगाव ग्रामस्थ, साकोरे पाटील परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. तुकाराम साकोरे पाटील यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव होता. स्पर्धेच्या संगणकीय युगात आधुनिक पद्धतीने शेती करून फुलगाव परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला. मुलांना, मुलींना, पुतण्यांना आदर्श संस्कार शिकविले. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे, दोन भाऊ, वाहिनी, पुतणे, असा मोठा परिवार आहे. फुलगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक, ह.भ.प.श्री. अविनाश पांडुरंग साकोरे पाटील यांचे ते चुलते, फुलगाव येथील पोलीस पाटील सौ. योगिता दिपक साकोरे पाटील यांचे ते सासरे, फुलगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. मंदाकिनी संपतराव साकोरे पाटील यांचे ते दीर होत. 

     कै. तुकाराम दगडू साकोरे पाटील यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजता, भीमा नदी काठी, महादेव घाट फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे येथे होणार आहे. प्रवचन सेवा, ह.भ.प. सागर महाराज शिर्के ( शिरगाव, भीमा शंकर ) यांची होईल. दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, साकोरे परिवारातील नातेवाईक, फुलगाव परिसरातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. साकोरे पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

0/Post a Comment/Comments