शेतकऱ्यावर जातीय अत्याचार,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

व्यापारी पिता पुत्राचा परत एक प्रकार

लोकनेता न्युज नेटवर्क

किनगाव राजा | महेश मुंढे :- सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा येथे कापसाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर जातीय अत्याचार, मारहाण व जीवघेणी धमकी दिल्याची गंभीर घटना घडली,

 याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार अ.जा.ज.अ.प्र. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, प्रल्हाद नामदेव साळवे वय वर्ष 59 जउळका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपूर्वीच आरोपी पवन प्रल्हाद जायभाये यांनी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून समाज माध्यमावर स्वतः आत्महत्या करत असल्याचा बनावट व्हिडिओ टाकून संजय मातोंडकर ठाणेदार किनगाव राजा यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले होते परंतु ठाणेदार संजय मातोंडकर यांनी अतिशय शांतपणे व्यवस्थित रीतसर तपास केला तेव्हा आरोपी प्रल्हाद आश्रुबा जायभाये व पवन प्रल्हाद जायभाये यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडण्यासाठी हा सर्व बनाव केल्याचे निष्पन्न झाले होते आणि आताही फिर्यादी प्रल्हाद नामदेव साळवे यांचे कापसाचे पैसे बुडवण्यासाठीच हा सर्व प्रकार केला आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.18 नोव्हे.2025 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रल्हाद साळवे त्यांची पत्नी गिताबाई साळवे व पुतण्या शिवाजी साळवे सर्व रा. लिंगा 

 हे लिंगा येथे आरोपी प्रल्हाद आश्रुबा जायभाये यांचे घरी पैसे मागण्यासाठी गेले असता प्रल्हाद जायभाये यांनी त्यांची कॉलर धरून त्यांना लोटलाट केली व पवन जायभाये यांनी जातिवाचक शिवेगाळ करत " डफडे वाजवायचे काम करा ढोर काढा मांगटयांनो " असे अपमानास्पद वक्तव्य केले व आरोपी पुष्पा व ऋतुजा जायभाये यांनी फिर्यादी प्रल्हाद नामदेव साळवे यांच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली . प्रल्हाद नामदेव साळवे यांच्या माहितीनुसार व्यापारी पिता पुत्र जायभाये यांनी त्यांचा 19 क्विंटल 26 किलो कापूस विकत घेऊन त्यातील 1, 37,709 / रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

 याप्रकरणी कायमी अप क्र. 291 /2023 नुसार आरोपी प्रल्हाद अश्रुबा जायभाये, पवन प्रल्हाद जायभाये, पुष्पा प्रल्हाद जायभाये, ऋतुजा पवन जायभाये सर्व रा.

 लिंगा ता. सिंदखेड राजा यांच्याविरुद्ध 

361(2),115(2),351(1),352,3(5)BNS

सह कलम 3(2)(va)3(1)(r)(s)अ. जा. ज. अ. प्र. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून म. पो.हे. कॉ. सोनल चव्हाण (ब. न. 1763) यांनी नोंद केली आहे पुढील तपास माननीय SDPO कदम मॅडम देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 सदर घडलेल्या घटनेमुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी दिसत आहे आधीच नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यातच परत काही समाजकंटक व फसवे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहे त्यामुळे सदर घटनेत कोणावरही दया न करता कडक कारवाई करून शेतकऱ्यांना व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा

________________________


0/Post a Comment/Comments