लोकनेता न्यूज नेटवर्क
नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा नगर परिषद क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानुसार स्थिर सर्वेक्षण पथकाची (SST) स्थापना करण्यात आली. तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करत आहे. या पथकावर नोडल अधिकारी म्हणून अजितकुमार बांगर, गट विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च व निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक (SST) काम करत असते, दि 11 नोव्हेंबर पासून सिंदखेड राजा नगर परिषद क्षेत्रामध्ये SST पथकाचे काम चांगल्या प्रकारे सुरु आहे, या निवडणुकीत SST पथकाच्या माध्यमातून महत्वाचे कार्य पार पडेल यात शंका नाही.
सिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक असून येथून मराठवाड्यातील जालना जिल्हा सुरू होतो. जालना तसेच छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
सिंदखेडराजा येथे दोन SST (स्थिर सर्वेक्षण पथक) स्थापन केले आहेत, एक पथक नटराज हॉटेल मेहकर रोड येथे असून दुसरे पथक टी पॉईंट येथे स्थापन केले आहे. दोन्ही पथकावर पाणी, लाईट तसेच इतर सुविधा पुरविल्या जात आहेत.
टी पॉईंट येथील पथकाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना SST पथकाचे महत्व समजावून सांगितले तसेच त्यांना मार्गदर्शक सूचना तहसीलदार अजित दिवटे यांनी केली. त्यावेळी देऊळगाव राजा आणि जालना रोड वरील टी पॉईंट येथे दीपक जाधव ,प्रवीण बगाडे , सुधाकर नागरे,आर के पांचाळ,संजय घुगे, ज्ञानेश्वर नागरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल मुळे, रघुनाथ मुंढे आणि फोटोग्राफर कर्मचारी येथे उपस्थित आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment