लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव राजा (महेश मुंढे) :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदखेड राजा तालुक्यातील जवळका नगरमाळ येथील तब्बल 28 शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन रु. 29,61,985/-ची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दि. 23/11/2025 रोजी पोलीस ठाणे किनगाव राजा येथे फिर्यादी रामेश्वर कारभारी सांगळे राहणार जवळका व इतर 28 शेतकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्र. 1- प्रल्हाद अश्रुबा जायभाये आरोपी क्र. 2- पवन प्रल्हाद जायभाये दोघे रा लिंगा ता. सिंदखेड राजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते 18/11/2025 रोजी परत या पिता-पुत्रांनी एका शेतकऱ्यावर जातीय अत्याचार केला होता त्या प्रकरणी फिर्यादी प्रल्हाद नामदेव साळवे यांचे तक्रारीवरून आरोपी क्र. 1 व 2 यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता 22/11/2025 रोजी आरोपी क्र. 2 पवन प्रल्हाद जायभाये याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. दि. 23/11/2025 पासून आरोपी क्र.1 प्रल्हाद अश्रुबा जायभाये याचा शोध सुरूच होता मा.ठाणेदार संजय मातोंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गीते , पोलीस कर्मचारी पोलीस ठाणे किनगाव राजा यांचे पथकास आज दि. 5/12/2025 ला यश मिळाले फरार आरोपी प्रल्हाद आश्रुबा जायभाये यास अटक करण्यात आली, या प्रकरणात मा. संजय मातोंडकर ठाणेदार किनगाव राजा त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ तक्रार प्राप्त होताच तात्काळ तपास सुरू केला नाही तर तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि गुप्त चौकशीच्या आधारे आरोपीचा मागवा घेतला यादरम्यान अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी कारवाईत कोणतीही ढीलाई न ठेवता तत्परतेने, सातत्याने कारवाई पुढे चालू ठेवली शेतकऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहिती सोबतच तपास पथकाने संबंधितांचे जबाब, समाज माध्यमांवरील हालचालिंवर बारकाईने लक्ष ठेवून आरोपी प्रल्हाद अश्रुबा जायभाये व पवन प्रल्हाद जायभाये यांना अटक केली, ही अटक म्हणजे फक्त एका गुन्ह्याचा उलगडा नसून भविष्यात अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना दिलेला कडक इशारा आहे.
किनगाव राजा पोलिस दलाची ही जलद व प्रभावी कामगिरी पाहता ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले असून तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे व नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment