लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (संतोष जाधव) :- माळेगाव : माळेगाव येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीचा माहितीपूर्ण स्टॉल क्रमांक 60. आधुनिक शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती, तसेच कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन या स्टॉलवर दिले जात असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गटशेतीसारखीच सामूहिक प्रगतीची दिशा डॉ प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषि विस्तार, कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी नांदेड-2 यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, जशी गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफ्यात वाढ होते, तशीच सामूहिक पद्धतीने ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत होऊ शकते. स्टॉलवर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, मृदा परीक्षण, जलसंवर्धन, तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर टिकाऊ शेती पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनात डॉ संतोष चव्हाण, शास्त्रज्ञ, उद्यानविद्या यांनी कृषि विभागातर्फे आयोजित पीक स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पहिले.
प्रदर्शनाला आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, सगरोळी केंद्राचा स्टॉल त्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी पडणारी माहिती देतो. विशेषतः सेंद्रिय शेती व मृदा परीक्षणाविषयीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत असून, उत्पादन खर्चात बचत व नफ्यात वाढ करण्यास मदत होत आहे.
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीचे तज्ज्ञांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, स्टॉल क्रमांक 60 ला अवश्य भेट द्यावी. येथे मिळणारी माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच मदत करेल.
मालेगाव कृषी प्रदर्शनात
सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा स्टॉल क्रमांक 60 आधुनिक तंत्रज्ञान व शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment