लोकनेता न्यूज नेटवर्क
देगलूर (जयपाल दावनगीरकर) :- 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता. तब्बल दोन वर्ष, 5 महिने 11 दिवस भारताची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास तीन वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झालेले हे संविधान भारताच्या लोकशाहीची पायाभरणी घडवली आणि नागरिकांना हक्कासोबत कर्तव्याची ही जाणीव करून दिली.
भारताचा संविधान दिन हा केवळ उत्सव नसून भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीची एक आठवण आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिनानिमित्ताने देगलूर तालुक्यातील टाकळी जहांगीर येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत संविधान निर्माते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये संविधानाचे सामुहिक वाचन, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक प्रल्हाद डी. नाईक, सह शिक्षक एन. के. पल्लेवाड, डि. एल. मुदगुरे, एस.बी. सगर, बी. एस. केंद्रे, सौ. एस. एस. परसेवार, एस. जी. पवार, जी. एस. मठपती, गावातील विद्यार्थी पालक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/




Post a Comment