हेमंत कुमार मिसलवाड अध्यक्ष, उद्धव बंडेवाड सचिव वर्कर्स फेडरेशनची जिल्हा कार्यकारणी निवड


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- दि. 07.डिसेंबर 2025 रोजी कॉम्रेड दत्ताजी देशमुख सभागृह साठे चौक नांदेड येथे नांदेड परिमंडळ अंतर्गत नांदेड मंडळाची ची कार्यकारणी बैठक कॉम्रेड संजय टाक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कॉम्रेड पी.एन. तेलंग यांच्या प्रमुख पाहुणे व कॉम्रेड एस. एम. स्वामी, कॉम्रेड विजय रणखांब, कॉम्रेड माधव गोरखवाड, कॉम्रेड मोईनभाई, कॉम्रेड सतीश वाघमारे,कॉम्रेड शंकर खिस्से पाटील,कॉम्रेड भीमराव खानसोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली त्या बैठकीस नांदेड परिमंडळ,मंडळ तसेच देगलूर, भोकर, नांदेडशहर, नांदेड ग्रामीण विभागातील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या बैठकीत नांदेड मंडळ अध्यक्षपदी कॉम्रेड हेमंतकुमार राजूरकर(मिसलवाड),उपाध्यक्षपदी कॉम्रेड गोविंद कल्याणकर, कॉम्रेड स्मिता ठक्के तर नांदेड मंडळ सचिव पदी कॉम्रेड उद्धव बंडेवाड व सहसचिव कॉम्रेड हनुमंत चोंडे, कॉम्रेड संदीप नरोड, कॉम्रेड शेख अहमद, कॉम्रेड राजू डोईजड, कॉम्रेड श्रीराम ढगे, आणि मंडळ संघटक कॉम्रेड सचिन खांडेकर, श्रीकृष्ण टाकळीकर, मंडळ सदस्य दत्ता मेनकुदळे, विश्वनाथ परळकर मंडळ प्रसिद्धीप्रमुख प्रमोद कळसे मंडळ तांत्रिक सदस्य भैय्यासाहेब सोनकांबळे या सर्व पदाधिकारी यांची एक मताने लोकशाही तसेच लोकमताने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली या बैठकीस झोन,सर्कल, विभागीय स्तरावरील पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन बालाजी सक्करगे नांदेड यांनी केले तर आभार कॉम्रेड उद्धव बंडेवाड यांनी मानले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments