लोकनेता न्युज नेटवर्क
मुदखेड (किशोर मुंगल) :- शहरातील सराफा बाजारातील कदम ज्वेलर्स येथे सोनार कारागीर म्हणून असलेल संतोष किशनराव टाक वय ५४ वर्ष राहणार व्यंकटेश नगर हे प्रत्येक मंगळवारी बारड येथील शीतला देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना सीता नदी जवळील शमशान भूमी पुढील वळणावर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक देत दोन्ही पायांवरून गेल्याने दोन्ही पाय जागीच निकामी झाले आणि गंभीर दुखापत झाल्याने संतोष टाक यांना ताबडतोब नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सविस्तर वृत्त असे की शहरातील व्यंकटेश नगर येथील रहिवाशी संतोष किशनराव टाक हे कदम ज्वेलर्स येथे सोनार कारागीर म्हणून कामावर होते प्रत्येक मंगळवारी बारड येथील शीतला देवीचे दर्शन घेण्यासाठी जायायचे दि.16 डिसेंबर रोजी सकाळी ठीक ०९: ०० वाजता आपल्या मोटार सायकल सुपर
स्पेलेंडर MH २६- AZ 174 ने बारड
कडे जात असताना अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली त्यात त्यांच्या दोन्ही पायावरून टिप्परचे चाक गेल्याने जागीच दोन्ही पाय निकामी झाले आणि गंभीर झालेल्या टाकला नांदेड येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते परंतु खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच शहरात हळहळ होत असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन ची प्रकिया सुरू असून बातमी लिहे पर्यंत मुदखेडच्या पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दाखल झाली नसल्याची माहिती आहे. या घटनेच्या निषेधार्थ दि.१७ डिसेंबर बुधवारी मुदखेड बंदची हाक देत शहरातील सर्व सामान्य नागरिकांनी दिली. मोंढा भागातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शहरातून भरधाव जाण्याऱ्या अवैध रेतीच्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून सामान्य नागरिकांना संरक्षण देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment