लोकनेता न्युज नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी) :- डॉ. शिवानंद ललिता विठ्ठलराव गुंडे, (अधीक्षक) माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे महाराष्ट्र शासन यांची पुणे येथील कार्यालयात सदिच्छा भेट दिली. गुंडेवाडी गावचे सुपुत्र, ता- लोहा, जि - नांदेड.
गुंडेवाडी गावातील उच्च शिक्षण परंपरा सुरु झाली ती श्री बळीराम भोजाजी वडजे, डॉ. दिगंबर भोजाजी वडजे यांच्या पासून, म्हणजेच अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेता येतं आणि पुणे मुंबई सारख्या महानगरामध्ये आपले अस्तित्व निर्माण करता येतं.......
डॉ. शिवानंद जी गुंडे अणि अमोलजी गुंडेवाडीतील जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी खर तर शाळेत पाहिले ते चौथी पर्यंत चे सर्व विद्यार्थी एकच वर्गात बसायचे आणि सर्वाना शिकवण्यासाठी दोनच शिक्षक असायचे.
अशा प्रकारच्या जिल्हा परिषदेची शाळा त्यानंतर माध्यमिक शाळा ही संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 11 आणि 12 वी पर्यंत चे शिक्षण व त्यानंतर 12 Science झाल्यावर प्रत्येकाच्या आई वडिलांच स्वप्नं असतं की आपला मूलगा डॉक्टर किंवा engineer व्हावा त्याप्रमाणे त्यावेळी चा शिवानंद यांचा BAMS ya Medical Course साठी सावंतवाडी येथे नंबर लागला आणि सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे त्या BAMS पूर्ण केले आणि जीवनाची खरी परीक्षा सुरू होते ते UG चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, कही विद्यार्थी हे प्रॅक्टिस करतात तर काही जणं MD करतात परंतु डॉ. शिवानंद यांनी मात्र या पैकी काहीही न करता पुण्यात येऊन Part Time Hospital Job Suru केला आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी सुरु केली, डॉक्टर शिवानंद म्हणजेच लाडाने गावांत त्यांना सर्व जाण बाळु च म्हणायचे आजही आमची पुर्ण पिढी त्यांना त्याच नावाने ओळखते, खरं सांगायचं तर आमचे गावं अतिशय लहान काही बोटावर मोजण्याऐवढे व्यक्ती महत्त्व सोडले तर 90% गावाला जमीन अतिशय कमी मात्रेत ( अल्प भूधारक) पण आमच्या गावचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कष्टकरी गावकरी, त्याला अपवाद डॉ. शिवानंद ची ही परिस्थिती नव्हती वडिल विठ्ठलरावजी गुंडे स्वतःची शेती सांभाळून जोड व्यवसाय म्हणून (Tailor) उत्तम दर्जाचे कपडे शिवण काम करत असत आणि गावामध्ये विठ्ठल टेलर या नावाने प्रसिद्ध आहेत. आई सौ. ललिता विठ्ठल गुंडे यांना सर्व थोर मंडळी ललिताबाई म्हणून ओळखयाचे आम्ही मूल मात्र ललित अक्का या नावाने ओळखत असायच त्या आमच्या अंगणवाडी शिक्षिका होत्या, अतिश हुशार, प्रेमळ आणि बोलका स्वभाव त्यामुळे आम्हाला त्यांची कधी भीती वाटायची नाही. परंतु दुर्दैवाने त्या अवेळी ( फारचं लवकर) अनंतात विलीन झाल्या , त्यावेळी डॉक्टर शिवानंद हे 12 ला होते. आईच्या मायेचे छत्र कायम स्वरुपी हरवल्यावर काय दुःख, वेदांना असतील......ते मूल आणि पत्नी गेल्याचं दुःख काकांनी किती सहन केलं असेल पण अशा ही परिस्थिती, काकांनी दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले व एक डॉक्टर होऊन 1 st Attempt मध्ये MPSC Exam krack करून STI झाला पण डॉक्टर शिवानंद एवढ्यावर न थांबता पुढे परीक्षा देत च गेले आणि 2 nd Attempt मध्ये ते यवतमाळ येथील शिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत झाले, त्या पदावर उत्तम प्रकारचे काम केल्या नंतर त्या पुंढे Pramotion मिळाले व त्यांची बदली जून 2025 ला पुणे येथे झाली. मागील बरीच महिने भेटण्याचा मानस होता पण तो काही योग येतं नव्हता आज तो योग आला आणि बऱ्याच वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा पुण्यात भेटलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कूठे ही हार न मानता परिस्थिती ची सामना करून डॉक्टर शिवानंद आज या पदावर कार्यरत आहेत.
हे सर्व विद्यार्थीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
लेखक :-
डॉ. गजानन रामकिशन वडजे
( MD Ayurved PhD Scholar)
9970329795.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)

Post a Comment