लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार 44 प्रवासी थेट उपलब्ध असल्यास कंधार आगारातून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत राज्य परिवहन महामंडळ च्या नांदेड विभागातून पर्यटन बस सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवासी समूहाला एकत्रित प्रवास करून महाराष्ट्रातील विविध मंदिर धार्मिक क्षेत्र गड किल्ले आधी ठिकाणी भेट देऊन रापम च्या सेवेचा अल्प दरात लाभ घेता येणार आहे कंधार आगारातून पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे 44 प्रवासी थेट उपलब्ध असतील तर ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे तसेच दशमी एकादशी द्वादशी ला कंधार आगारातून पंढरपूर येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू केलेल्या पर्यटन बसचा प्रवाशांनी यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक देवदर्शन व इतर ठिकाणी लाभ घेतला आहे ही बस सेवा अत्यंत चांगली व पर्यटनांचा आनंद देणारी असून अत्यल्प दराची आहे आपण स्वतः या क्षणाचे साक्षीदार होऊन पंढरपूर कोल्हापूर सह विविध परिसरातील स्थळांना भेटी देण्यासाठी कंधार व लोहा महिलांनी व इतर पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान प्रभारी आगार व्यवस्थापक अनिल पळनाटे यांनी केले आहे.
येथे करता येईल पर्यटन धार्मिक दर्शन
पंढरपूर पन्हाळा जोतिबा कोल्हापूर गणपतीपुळे दर्शन व परत परळी वैजनाथ औंढा नागनाथ वेरूळ घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर (भीमाशंकर पाच ज्योतिर्लिंग) साडेतीन शक्तीपीठ माहूर सप्तशृंगी गड कोल्हापूर तुळजापूर परत अष्टविनायक दर्शन महाबळेश्वर पाचगणी दर्शन तुळजापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी पंढरपूर दर्शन व परत शनिशिंगणापूर शिर्डी दर्शन परत कोल्हापूर जेजुरी दर्शन परत वेरूळ अजंठा लेणी राजुर गणपती दर्शन परत देऊळगाव राजा लोणार सरोवर शेगाव दर्शन परत.
लग्नसराई ओसरली...!
दिवाळी सुट्टी हंगामानंतर लग्नसराईमुळे एसटी बसेस मध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे आता मोजकेच मुहूर्त शिल्लक आहेत लग्नसराई ओसरली आहे त्यामुळे अनेक जण पर्यटन धार्मिक दर्शनाचा बेत अखतात समूहाने जाणाऱ्या प्रवासासाठी रापमने पर्यटन बस सेवा उपलब्ध केली आहे.
प्रवाशांनी आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुखाशी संपर्क साधून इच्छुकांनी लाभ घ्यावा या पर्यटन व सेवेत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीसह अमृत ज्येष्ठ योजना लागू आहे.
अनिल पळनाटे
प्रभारी आगार व्यवस्थापक
कंधार.
-----------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment