तांदळी येथे संतसंग समितीच्या श्रमदानातून वनराई बंधारा


लोकनेता न्युज नेटवर्क

मुखेड (एस.डी.जमदाडे) :- मुखेड : जगद्गुरु संत नरेंद्र स्वामी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात संतसंग समितीच्या वतीने ७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कच्चे वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुखेड तालुक्यातील तांदळी गावाजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यावर संतसंग समितीच्या श्रमदानातून अंदाजे १५ ते २० फूट लांबीचा व चार फूट उंचीचा वनराई बंधारा बांधण्यात येत आहे. या ठिकाणी आतापर्यंत दोन वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.

या कामामुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठीही याचा लाभ होणार आहे. बंधारा उभारणीच्या वेळी तांदळी येथील सरपंच प्रतिनिधी, केशव पाटील इंगळे, जिल्हा सेवा समितीचे संजीवनी प्रमुख शंकर पाटील नकाते, महेश पाटील इंगळे, तालुका अध्यक्ष मारुती बिरादार, संत सेवा प्रतिनिधी गोविंद पाटील वडजे, माधव पाटील वडजे, गोपीनाथ पांचाळ, रामदास पांचाळ, नामदेव पाटील जाधव, किशन पाटील वडजे, पुंडलिक मेथे, ज्ञानेश्वर पाटील ढगे यांच्यासह समस्त संत संघ सेवा समिती तांदळी तसेच गावातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामूहिक श्रमदानातून जलसंधारणाचे काम होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments