लोकनेता न्युज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- मौजे.पळसपूर ता.हिमायतनगर येथे कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या वतीने व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व सामूहिक आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बीडीएन -716 या वाणासाठी मार्गदर्शन, शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद, गटचर्चा, शेतकऱ्यांचे अभिप्राय तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशक,बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक, ट्रायकोडर्मा वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यांनी तूर पिकातील किड व रोग व्यवस्थापन तसेच जैविक निविष्ठा चा योग्य वापर याबद्दल शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले
प्रा.संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच तुर पिका खालील क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच तुर पिकातील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, शेतीमध्ये प्रसार व सामाजिक माध्यम व विविध शेती विषयक मोबाईल ॲप व त्याचा योग्य वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास 30 शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावचे श्री. वानखेडे, कृषि सखी सौं. वंदना वानखेडे,कृषीमित्र कल्याण वानखेडे, स. कृ.अ. भुर्के, पत्रकार श्री. शिंदे प्रगतशील शेतकरी व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment