लोकनेता न्युज नेटवर्क
सिरसी (जाधव व्यंकटी) :- जागतिक मृदा दिवसाचे औचित्य साधून मौजे शिरसी बु.येथे जागतिक व्यापार मृदा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला व
जागतिक मृदा दिना दिवशी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले...
प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री विलास जी नरवटे साहेब उपविभागीय अधिकारी कंधार मा.श्री रामेश्वर गोरे साहेब तहसीलदार कंधार तसेच मा. श्री प्रशांत कासराळे साहेब तालुका कृषी अधिकारी कंधार व मा.श्री एम एस गुट्टे साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठवडज यांची प्रमुख उपस्थिती होती . मा.श्री विलास नरवटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मृद संधारणा बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच जैविक शेती व जलतारा प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन केले व सखोल असे मार्गदर्शन केले .
तसेच मा.श्री रामेश्वर गोरे साहेब तहसीलदार कंधार यांनी मृदसंधारण चे महत्व शेतकऱ्यांना समजून सांगितले. तसेच मा. श्री प्रशांत कासराळे साहेब तालुका कृषी अधिकारी कंधार यांनी मृदा व संधारणाचे महत्त्व समजून सांगत शाश्वत शेतीचा विकास केला पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रगतशील शेतकरी
सुभाष कौशल्ये, बालकिशन गोणारे, गोविंद कैलासे, लोकडू हरी येडे, अमोल आतनुरे, धनराज येडे, लोकडू कौशल्य, प्रदीप कैलासे, व्यंकटी जाधव, इत्यादी प्रगतशील शेतकऱ्याचा सत्कार मान्यवरांनी केला...
सौ पूजा कदम सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यास मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले...या कार्यक्रमासाठी सहाय्यक कृषी अधिकारी एन बी कुंभारे, जी.एस ढाकणे, एच.जी थोटे, बी एस पेटकर, श्रीमती यु जी देशमुख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती... तसेच महसूल विभागातील मंडळ महसूल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम विस्तार अधिकारी हे पण उपस्थित होते
या कार्यक्रमास गावातील सरपंच प्रतिनिधी नागेश कैलासे उपसरपंच पोलीस पाटील प्रगतशील शेतकरी महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment