लोकनेता न्युज नेटवर्क
उस्माननगर (गणेश लोखंडे) :- लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील माळावरील महादेव मंदिर येथे श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दि.५ डिसेंबर रोजी शुक्रवारी करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते १२ पर्यंत पिंड, कलश पुजा व होम हवन होणार आहे .
पिंड प्राणप्रतिष्ठापना सकाळी ०९ ते ११ पर्यत,कलशारोहण , सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत किर्तन होणार आहे.
कलशारोहण सोहळा किर्तनकार श्री ह.भ.प. विजयानंद महाराज सुप्पेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
परिसरातील भाविकांनी श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळींनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment