लोकनेता न्युज नेटवर्क
दौंड (जयदीप बगाडे) :- निर्दोष मुक्तता सत्याचा विजय दौंड रेल्वे हद्दीतील गोरगरीब झोपडपट्टी धारकांसाठी व त्यांच्या न्यायहक्कासाठी सन २०१८ रोजी रेल्वे रोको केल्याबद्दल दौंड रेल्वे कोर्टात मागील ७ वर्षापासून सुरू असलेल्या केसचा आज दिनांक ०८ डिसेंबर, २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला, यामध्ये आरोपी करण्यात आलेले आबा वाघमारे (अध्यक्ष,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती संस्था,दौंड), भारत सरोदे (अध्यक्ष,मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटन व मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवा संस्था,दौंड) आणि नागसेन धेंडे (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा विकास दल) यांची दौंड रेल्वे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.सदरील प्रकरणात ॲड. साईनाथ येरोळ यांनी सर्व आरोपींच्या वतीने गोरगरीब झोपडपट्टी धारकांची भुमिका कोर्टात ठामपणे चांगल्या प्रकारे, निस्वार्थ पणे मांडली. त्याबद्दल सर्व आंदोलक यांनी ॲड. साईनाथ येरोळ साहेबांचे जाहीर आभार.मानले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment