लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (महेश पडोळे) :- सिकंद्राबाद येथे रेल्वे डीआरयुसीसी मेबर सदस्य समीतीची बैठक संपन्न झाली.
सदरील बैठकीत हैदराबाद डिव्हिजनचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर संतोष कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे डी यु आर सी सी मेंबर पारसमल दर्डा यांनी उमरी रेल्वे स्थानकातील प्रलंबित मागण्या विषयी डी आर एम संतोष कुमार वर्मा यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत गाडी संख्या 17231 नरसापुर नगरसोल, गाडी संख्या 17232 नगरसोल नरसापुर, गाडी संख्या 12787 नरसापुर नगरसोल, गाडी संख्या 12788 नगरसोल नरसापुर तसेच निजामाबाद पंढरपुर गाडी संख्या 11413, पंढरपूर निजामबाद गाडी संख्या 11414 सदरील गाडीला स्लीपर कोच लावण्यात यावे. तसेच निजामाबाद पुणे गाडी संख्या नंबर 11410 पुणे निजामबाद गाडी संख्या 11409 सदरील गाडीला स्लीपर कोच जोडण्यात यावे. रॉयलसीमा एक्सप्रेस गाडी संख्या नंबर 12793 तिरुपतीहुन निजामाबाद पर्यंत चालणारी गाडी ही नांदेड पर्यंत सोडण्यात यावी. भगतकी कोठी काचीगुडा ते भगतकी कोठी गाडी संख्या नंबर17605, भगत की कोठी ते काचीगुडा गाडी संख्या नंबर 17606 या गाडीचा उमरी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात यावा.
उमरी रेल्वे स्थानकात रेल्वे स्टेशन मधून बाहेर जाण्यासाठी
फुट ब्रीज मंजूर करण्यात यावा .रेल्वे स्थानकात पर्मनंट आरपीएफ देण्यात यावे. रेल्वे स्थानकात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच अजमेर जयपुरला जाण्यासाठी जयपूर एक्सप्रेस गाडीला उमरी स्थानकात थांबा देण्यात यावा
रेल्वे स्थानकात तात्काळ शौचालय बाधुन देण्यात यावे
अशा विविध मागण्याचे निवेदन देऊन या मागण्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
वरील मागण्या विषयी सकारात्मक विचार प्रयत्न करणार असल्याचे अश्ववाशन संबंधित रेल्वे अधिकाऱ्यानी.
हैद्राबाद डिव्हिजन चे रेल्वे डी आर यु सी सी मेबर पारसमल दर्डा यांना दिले या वेळी उपस्थित काही क्षण.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment