लोकनेता न्युज नेटवर्क
माहूर (राजकिरण देशमूख) :- श्रीक्षेत्र माहूरगड कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने शनिवार-रविवारची विशेष गर्दी वाढलेली असते. दूरदूरहून भाविक दर्शनासाठी येत असल्याने परिसर नेहमीच गजबजलेला असतो. श्री रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाच्या पिलरचे आणि उत्खननाचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना टळली.
काम चालू असताना अचानक मोठे दोन आणि लहान तीन ते चार दगड अचानकपणे रस्त्यावर कोसळले त्या वेळी रस्त्यावरून जात असलेल्या ऑटोमध्ये तिघे भाविक बसलेले होते. दगड सरळ ऑटोकडे आला; सुदैवाने भाविक थोडक्यात बचावले. ऑटोच्या मागील भागावर दगड आदळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कार वरही दोन ते तीन लहान दगड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना श्री रेणुका माता मंदिरात आरती सुरू असताना दि 8 रोजी दुपारी 12 वाजता घडली आहे
माहूर गडावरील असेल रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून लिफ्ट आणि स्कायवॉकसह विविध कामांची गती अत्यंत मंद आहे काम प्रगतीपथावर असले तरी काम चालू आहे, वाहने हळू चालवा, रस्ता बंद, स्कायवॉक बांधकाम सुरू अशा कोणत्याही प्रकारचा सूचना फलक गडावर दिसत नाही.
काम सुरू असताना घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतल्या गेलेली नाही सुरक्षारक्षक भिंतीचे काम अर्धवट असल्याने वरच्या भागावर सुरू असलेल्या कामाचे दगड मुरूम रस्त्यावर कोसळत आहेत याआधी महाकाली मंदिर सुरक्षा रक्षक भिंतीचे दगडही रस्त्यावर कोसळले होते हे दगड कोसळत असताना अनेक भाविकांची वाहने रस्त्यावरून ये जा करत होते सुदैवाने जीवित्त हानी झाली नाही
लिफ्ट आणि स्काय वाक कामाचे कंत्राटदार डी सी गुरुबक्षानी कंट्रक्शन कंपनी नागपूर यांनी रस्त्यावरून उंच टेकड्यावर असलेले काम करत असताना सुरक्षा माफदंडाचे काटेकोरपणे पालन करावयाचे असताना नियमांना तिलांजली देत काम सुरू असल्याने सुरक्षेचा प्रश्न एरणीवल आला असून दुकानदारांनी उजव्या बाजूची सर्व दुकाने रिकामे करूनही कामाला गती नाही अपघातात जमीर भाई हे आपल्या परिवार जणांना घेऊन नवीन ऑटोद्वारे शेख फरीद बाबा दर्गा येथे दर्शनासाठी जात असताना दगड पडला त्यामुळे त्यांचे पंधरा ते वीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याने त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment