शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी बाबुस ढगे यांची निवड


लोकनेता न्युज नेटवर्क

मुदखेड (सदानंद शिंदे) :- मुदखेड तालुक्यातील महाटी येथे शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष पदी बाबूस पुरभा पाटील ढगे तर उपाध्यक्ष म्हणून सौ.सविता गोविंद पाटील ढगे यांची निवड करण्यात आली.दि. 30डिसेंबर रोजी समितीच्या वतीने पुनर्गठीत बैठक बोलावण्यात आली होती.त्या बैठकीमध्ये सर्वानुमते बिनविरोध पणे अध्यक्ष म्हणून बाबूस पुरभा पाटील ढगे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून सौ.सविता गोविंद पाटील ढगे यांची निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणूनआनंदराव ढगे,मिलिंद जाधव,मेघना गागलवाड,राठोड सर,बाबू पांचाळ,रेणुका कोंकेवाड, शालेय व्यवस्थापन समिती शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे,शाळेला शासनाकडून किंवा इतर मार्गाने मिळणाऱ्या निधीचे योग्य व्यवस्थापन करणे,बालकाच्या हक्काचे संरक्षण करणे,शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण सुधारणे,पालकांना शाळेच्या कामात सहभागी करणे,शाळेच्या विकासासाठी योजना तयार करणे,शालेय व्यवस्थापण समिती प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावते. बाबुस ढगे हे गावातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात.एक शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांना अध्यक्ष पदी निवड केली.निवड झाल्यानंतर गावाकऱ्याच्या वतीने पुष्पमाला घालून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले.बैठकीला उपस्थित गावचे सरपंच प्रतिनिधी बळी पाटील ढगे,पोलीस पाटील श्री.आदिनाथ ढगे,मुख्याध्यापक श्री.भोसले सर,चेअरमन संभाजी ढगे,पत्रकार साहेबराव गागलवाड,मारुती ढगे, नवनाथ ढगे,प्रदिप ढगे,दिलीप ढगे,गणेश ढगे,संघदीप ढवळे, गणेश ढगे, रामेश्वर ढगे,बालाजी ढगे, संभाजी ढगे,श्याम ढगे,रामेश्वर ढगे, उद्धव ढगे,बालाजी ढगे, विनायक ढगे,उत्तम ढगे, तसेच राठोड सर, शिरूरकर सर उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments