माळेगावच्या खंडोबाचीवारी शिराढोणचा प्रत्येक खंडोबा भक्त करी



लोकनेता न्युज नेटवर्क

शिराढोण (लक्ष्मण पांडागळे) :- प्रति वर्षांप्रमाणे याही वर्षी शिरढोण ते श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा पदयात्रा

आज शिराढोण येथून निघाली. मानाच्या छत्रीचे दर्शन भाजपाचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी माधवराव पाटील पांडागळे साहेबांनी घेतले. यावेळी मानकरी व्यंकटराव माली पाटील, गुरु पंढरी पा.पांडागळे, मल्हारी पा.पांडागळे, मुक्ताराम पा. पांडागळे, मुक्ताराम हवगीराव पांडागळे, माधव पा.पांडागळे,संजय पा.पांडागळे, सदाशिव पा.पांडागळे, लक्ष्मण पांडागळे, अजिंक्य पांडागळे, संजय नांदेडे सह गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्व गावकऱ्यांनी दर्शन घेऊन पदयात्रेला शुभेच्छा दिल्या.

    शिराढोण येथून माळेगावकडे निघालेली पदयात्रेकरूंचा पहिला मुक्काम चिखलभोशी येथे असतो तर दुसऱ्या दिवशी जातेवेळी पोलेवाडी येथे दुपारचा भरीत भाकरीचा प्रसाद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे साहेब यांच्याकडून केला जातो. दुसरा रात्रीचा मुक्काम खेडकरवाडी या ठिकाणी असतो. सकाळी खेडकरवाडी येथून मानाची छत्री निघून दुपारपर्यंत माळेगाव येथे पोहोचते.  

शिराढोणच्या मानाच्या छत्रीला माळेगावच्या देवसवारी मध्ये परंपरेनुसार मानाचे स्थान असलेले दिसून येते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments