लोकनेता न्युज नेटवर्क
हवेली (संतोष कदम) :- पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालविनाऱ्या चालकांविरुद्ध 3 दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली.
दिनांक ०५ डिसेंबर ते ०७ डिसेंबर २०२५ रोजी दरम्यान 3 दिवस शहरातील विविध भागांमध्ये एकूण २० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून तपासणी करण्यात आली.
या विशेष कारवाईदरम्यान मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण १७६ वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.
चौकट
"पुणे शहर वाहतूक विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा"
— पुणे शहर वाहतूक विभाग
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment