लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (प्रतिनिधी) :- नमस्कार उमरीतील मतदार बंधू आणि भगिनींनो
निवडणुकीतील एक हार म्हणजे पराभव नाही, आणि एक जीत म्हणजेच अंतिम यशही नाही.
“एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, और एक हार से कोई मुकद्दर नहीं होता” — हा विचार मनात ठेवूनच पुढचा प्रवास ठरतो.
आज निकाल वेगळा असू शकतो, पण उमरीच्या विकासासाठीची आमची तळमळ, प्रामाणिकपणा आणि संघर्ष अजूनही तसाच आहे. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा सहभाग हाच आमचा खरा विजय आहे.
चूक कुठे झाली याचा आत्मपरीक्षण करून, अजून अधिक ताकदीने, अजून अधिक जबाबदारीने तुमच्या सेवेत उभे राहण्याचा निर्धार आम्ही करतो.
ही हार शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची चाहूल आहे.
उमरीसाठीचा लढा थांबणार नाही…
कारण जनतेच्या मनात जागा मिळवणे हाच खरा विजय असतो.
आपल्या सर्वांच्या सहकार्य व प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद.
आभारकर्ते...
मारोतराव कवळे गुरुजी
लोककल्याण कारी शेतकरी नेते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment