उद्योजक मनीष जैन यांच्या सामाजिक प्रेरणेतून सिलिकंट इंडिया कंपनीकडून भूमी फाउंडेशनला मदतीचा हात


लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली (संतोष कदम) :- सिलिकट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फुलगाव कंपनीचे डायरेक्टर मनीष जैन यांच्या सामाजिक बांधिलकीतून व संवेदनशील विचारांतून भूमी फाउंडेशन, वाघोली (पुणे) येथे कार्यरत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी,अनाथ व निराधार मुलींच्या निवासी प्रकल्पासाठी किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तू स्वरूपात महत्त्वपूर्ण मदत प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील दुष्काळ, आर्थिक अडचणी आणि शेतकरी आत्महत्यांमुळे पोरकेपणाच्या वेदना सहन करणाऱ्या मुलींसाठी ही मदत केवळ वस्तूरूप सहाय्य न राहता, समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा विश्वास देणारी ठरली.या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सिलिकंट इंडिया कंपनीच्या एच.आर.डायरेक्टर पौर्णिमा कांबळे मॅडम यांच्या पुढाकारातून करण्यात आली.त्यांच्या नियोजनामुळे संस्थेतील मुलींच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले अन्नधान्य व उपयोगी साहित्य योग्य प्रकारे उपलब्ध झाले.डायरेक्टर मनीष जैन यांच्या सामाजिक जाणिवेमुळे उद्योगविश्व आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम या उपक्रमातून दिसून आला.अशा प्रकारचे सहकार्य शेतकरी कुटुंबातील मुलींच्या सुरक्षित,सन्मानपूर्वक व आत्मनिर्भर जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार यांनी व्यक्त केले आहे.भूमी फाउंडेशनच्या वतीने प्रकल्पाच्या संचालिका अध्यापिका अनिता पवार यांनी मनीष जैन,एच.आर.डायरेक्टर पौर्णिमा कांबळे मॅडम,अक्षय होनराव,मुरलीधर सोनी तसेच सर्व सिलिकंट इंडिया कंपनीच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहे.अशा सामाजिक उपक्रमांमुळे मुलींच्या आयुष्यात नवी उमेद, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक बळ मिळत असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधीं म्हणून अध्यापिका अनिता पवार यांनी सांगितले आहे. यावेळी प्रकल्पातील सर्व निवासी कृषक कन्या तसेच कर्मचारी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments