जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले कृषि विज्ञान केंद्राच्या कामाचे कौतुक



लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- दिनांक 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या एका विशेष बैठकीत जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले यांनी कृषि विज्ञान केंद्र सग्रोळीच्या कामाचे विशेष कौतुक केले व इतर उपस्थिताना केंद्राला भेट देण्यासाठी आवाहन केले. जलतारा प्रकल्पामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करताना त्यांचा जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात त्यांनी सर्वाना केव्हीकेच्या AI आधारित ऊस प्रात्यक्षिक विषयीं स्वतः सर्वांना माहिती सांगितली. या सभेसाठी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे डॉ माधुरी रेवणवार व डॉ प्रविण चव्हाण सहभागी झाले होते. यांचबरोबर कर्डीले यांनी कृषि विज्ञान केंद्रातील इतर प्रात्यक्षिक युनिट पाहण्यासाठी सर्वांनी जावे असे आवाहन केले. त्यांनी केव्हीकेच्या नवनवीन प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ रेवणवार यांनी केव्हीके च्या सर्व उपक्रमाबद्दल उपस्थिताना माहिती दिली. या कार्यक्रमात पाणी फौंडेशन, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, कृषि विभाग या सर्वांचा समावेश होता.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments