चलो नागपूर.. चलो नागपूर.. चलो नागपूर.. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे संघटित व असंघटित कामगार नागपूर हिवाळी अधिवेशन धरणे आंदोलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा - रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष बीड


लोकनेता न्युज नेटवर्क

बिड (पांडुरंग हराळे) :- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ची राष्ट्रीय अध्यक्ष डॉं.जी.संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र इंटक प्रदेशाध्यक्ष डॉं.कैलास भाऊ कदम यांच्या आदेशावरून नागपूर हिवाळी अधिवेशन धरणे आंदोलन निर्देशनी करण्यासाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी संघटित व संघटित कामगार यांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

  देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या नवे ४ कामगार कायदे (Labour Codes) रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरूवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी स्थळ : यशवंत स्टेडियम, धनतोली, नागपूर येथे धरणे आंदोलने, निदर्शने करण्यात येणार आहे. . या कायद्यांमुळे कामगारांना रोजगाराची सुरक्षा, वेतन संरक्षण, आरोग्य–सुरक्षा व संघटन स्वातंत्र्य धोक्यात येणार असून सर्व कामगार बंधु भगिनींनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहा. असे आव्हान रामधन जमाले इंटक बीड जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments