वाई बाजार येथील ज्येष्ठ नागरिक आझाद खान पठाण यांचे निधन


लोकनेता न्युज नेटवर्क

माहूर (सूरज खोडके) :- वाई बाजार येथील ज्येष्ठ नागरिक आझाद खान कासम खान पठाण यांचे आज दि.३० डिसेंबर मंगळवार रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

आझाद खान यांच्या जाण्याने संपूर्ण वाई बाजार वासियांनी एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत असून आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिव देहावर वाई बाजार येथील कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

स्व.आझाद खान यांच्या पश्चात पत्नी ४ मुले सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments