कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या अमृत निर्झर काव्यसंग्रहाचे लोकनेते अरुणभाई गुजराथी व जेष्ठ कवी प्रा.वा. ना.आंधळे यांचे शुभहस्ते धुळे येथे प्रकाशन


लोकनेता न्युज नेटवर्क

भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या अमृत निर्झर या दमदार काव्यसंग्रहाचे प्रकाशन अहिराणी साहित्य परिषद धुळे च्या भव्य व्यासपीठावर दि.७ नोव्हेम्बर २५ रोजी , विधान सभा अध्यक्ष मा. अरुणभाई गुजराथी व खान्देशातील सुप्रसिद्ध जेष्ठ कवी प्रा.वा. ना.आंधळे यांचे शुभहस्ते अमृत निर्झरचे प्रकाशन करण्यात आले .समारंभाच्याअध्यक्षस्थानी धुळे येथील माजी आमदार शरद पाटील होते.व्यासपीठावर डॉ. अविनाश जोशी(अमळनेर),संदीप चौधरी(नंदुरबार),संदीप घोरपडे(अमळनेर),संजय मुंदडा(कार्याध्यक्ष राजवाडे संशोधन केंद्र धुळे)सुप्रसिद्ध कवी तथा लेखक प्रा.भगवान पाटील(अध्यक्ष अहिराणी साहित्य परिषद धुळे)सुप्रसिद्ध कवी प्रभाकर शेळके(सचिव अहिराणी साहित्य परिषद धुळे) डॉ.फुला बागुल (सुप्रसिद्ध समीक्षक साहित्यिक धिरपूर तथा उपाध्यक्ष अहिराणी साहित्य परिषद धुळे),विनोद कांदेले,दीपाली कांदेले व कवी ज्ञानेश्वर घुले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचलन अहिराणी साहित्य परिषदेचे संचालक रविंद्र वाणी यांनी केले.जिल्हा ग्रंथालयाच्या भव्य सभागृहात संपन्न झालेल्या या समारंभास धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांची भरगच्च उपस्थिती होती.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments