शेतकरी कल्याणासाठी संघर्ष झाला पाहिजे पण तो शेतकऱ्याचे कल्याण करणाऱ्याच्या दारातच का?


लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी (प्रतिनिधी) :- शेती संदर्भात आर्थिक दृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या या मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे हा योग्य निर्णय आहे यात दुमत नाही परंतु जी व्यक्ती स्वकष्टाने अपार मेहनत करून व अमाप कर्ज काडून शेतकरी हितासाठी उद्योग समूहाची निर्मिती करते त्याच उद्योग समूहाच्या कार्यक्षेत्रात आंदोलन उभारून आपणास काय सध्या करायचे आहे?

मागास समजल्या जाणाऱ्या या उमरी,धर्माबाद, नायगांव, बीलोली, भोकर या सह संलग्नित तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून वाघलवाडा या ठिकाणी साखर कारखाना उभारण्याचे काम आ कै.लक्ष्मणराव हसेकर साहेबांनी कै आ शंकरराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस वर्षापूर्वी केले होते तेव्हा देखील त्यांना अनेक विरोधाना सामोरे जाऊन संघर्ष करावा लागला परंतु शुद्ध भवणेनी लोक कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा विजय झाला आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना व बेरोजगारांना चांगले दिवस तेव्हा आले होते परंतु कै हासेकर साहेब कालवश झाल्या नंतर कारखाना बंद झाला आणि परत आमचा शेतकरी राजा आर्थिक संकटात येऊन हवालदिल झाल्याचे आपण साक्षीदार आहोत.

त्यानंतर बंद पडलेला भंगार अवस्थेतील कारखाना शेतकऱ्याच्या व अनेक हितचिंतकाच्या आर्थिक मदतीने *मा मारोतराव पाटील कवळे गुरुजी* यांनी खरेदी करून तो अवघ्या दोन महिन्यात गाळपासाठी सज्ज करून या भागाला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे.या भागातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला आणि लाखो शेतकऱ्यांना ऊसा सारखे शाश्वत पीक घेतल्यानंतर त्याचा योग्य परतावा मिळण्याची हमी मिळाली म्हणून मागील काही वर्षात आपल्या या भागात शेतकऱ्यांमध्ये सधनता आल्याचे आपण पाहतोय.

शेतकऱ्याचे प्रती एकरी उत्पन्न वाढावे म्हणून या भागातील इतर कारखाने काय योजना राबवतात कोणत्या करखण्यावर ऊस विकास अधिकारी आहेत?

कोणता कारखाना शेतकऱ्यांना बियाणे औषधी,गांडूळखत, मळी,राख उधारी तत्वावर वाटप करतो?

या भागातील कोणता कारखाना माझ्या शेतकऱ्याला ऊस उत्पादनाची आधुनिक पद्धत माहिती व्हावी त्याचे उत्पादन वाढावे म्हणून कारखान्याचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण घ्यायला पुण्याला व ईतर ठिकाणी पाठवतो?

या जिल्यातील कोणत्या कारखानदारांनी गेल्या हंगामात शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत प्रती टन 2800/- रुपये दर दिला? या सर्व बाबींचा अभ्यास या परिसरातील मायबाप शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे.या व्ही.पी.के. उद्योग समूह कुसुमनगर वाघलवाडा कारखान्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक नाहीतर दोन ऊस विकास अधिकारी आहेत त्यांच्या सोबत शेतकी विभागातील सर्व तज्ञ अधिकारी व कर्मचारी आहेत.शेतकऱ्यांना उधारी तत्वावर बेणे, ऊस रोप,गांडूळ खत,फवारणीच्या औषधी, प्रेसमड,राख या सर्व गोष्टी दिल्या जातात आणि गावोगावी जाऊन उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले जाते.या भागातील शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याच्या संदर्भात अभ्यास करून सुमारे चारशे कोटी खर्च करून नवीन अत्याधुनिक कारखाना उभारण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी करत आहेत.फक्त साखर निर्मिती करून आपण उच्चांकी भाव देऊ शकत नाहीत याचा विचार करून साखरेसह वीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती,गॅस निर्मिती सारखे बाय प्रोडक्ट निर्मितीचे नियोजन करीत आहेत हे येथील शेतरी बांधवांना ज्ञात आहे.मग आंदोलकांनी जिल्यातील इतर कारखानदार शेतकरी हितासाठी काय करत आहेत त्यांची मागील पार्श्वभूमी काय आहे हे तपासायला हवे आणि संपूर्ण जिल्याचा प्रश्न जर आपणास मांडायचा असेल तर आपण जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असलेल्या जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण मांडले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना बोलावून अडचणी विचारायला पाहिजे, जाब विचारला पाहिजे होता परंतु कोयता बंद करून उसाचे वाहने अडवून चक्का जाम करून शेतकऱ्याचे ऊस वाळवून तोडणी मजुर व ऊस वाहतूकदार या सर्वांचे नुकसान करणे कितपत योग्य आहे.

या हंगामाचा दर व्ही.पी.के. उद्योग समूहाने गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी जाहीर केलेला आहे आणि तो जिल्यातील उच्चांकी दर आहे आणि जिल्यातील इतर कोणत्याच कारखानदारांनी अद्याप दर जाहीर केला नाही मग तुम्ही त्यांच्या दरात जाऊन बसण्या ऐवजी करेगाव फाटा हे ठिकाण का निवडले असावे याचा अंदाज सर्वसामान्य जनतेने लावला आहे.आगामी राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन अथवा ठराविक राजकारण्यांची फूस घेऊन असेल कारण कवळे गुरुजी यांचा कारभार पारदर्शक आहे गुरुजींनी मार्केट कमिटीचा वजन काटा शेतकऱ्यांसाठी मोफत करून दिला आणि सांगितलं तिथे गाडीचा काटा करून कारखान्यावर काट्याला अना या पारदर्शक गोष्टी इतर कारखानदारांना पटल्या नसतील म्हणून शेतकऱ्याचे कल्याण करुपहणाऱ्या व्यक्तिमत्वाला बाळात्यातच मारण्याचा प्रयत्न काही लोकांचा असेल तर याद राखा...या भागातून शेतकरी कल्याणाचा विचार करून कारखाना उभारलेले ज्येष्ठ मंडळी कालवश झाले आणि कारखाना बंद पडला म्हणून या भागातील माझा शेतकरी बांधव पंचवीस वर्ष माघे पडला आणि आता कुठं कवळे गुरुजींच्या माध्यमातून या भागातील बेरोजगार तरुण,शेतकरी बांधव आणि या भागातील व्यावसायिक यांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे आपली वयक्तिक खळगी भरण्यासाठी येथील भोळ्या भाबड्या जनतेचे व तरुणांचे माथे भडकून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न कुणी करू नये..

साईनाथ सावंत 

ऊस उत्पादक तथा कर्मचारी वाघलवाडा ता. उमरी.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments