लोकनेता न्यूज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- ऐन मतदानाच्या दिवशीच मुंबई हायकोर्टातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आज मतदान होत असलं तरी याच्या निकालासाठी मात्र अजून १९ दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती समजली गेल्यास आश्चर्य वाटू नये.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही मिनिटांत मतदानाला सुरुवात होणार, अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार, या सर्व निवडणुक प्रक्रियेची धावपळ सुरू होती. आजचा निकाल उद्या म्हणजे ३ डिसेंबरला लागणार असल्याचं निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केलं होतं, मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच मुंबई हायकोर्टातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आज मतदान होत असलं तरी याच्या निकालासाठी अजून १९ दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
खरं तर, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासूनच अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगर पंचायतीचं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. उर्वरित ठिकाणी आज २ डिसेंबर रोजी मतदान पार पडत आहे.
ज्या ठिकाणंचं मतदान पुढे ढकललं आहे. तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारला आहे. राज्यातील सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का ? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. जेणेकरून उद्याच्या निर्णयाचा विपरीत परिणाम १९ डिसेंबरच्या मतदानावर होऊ शकेल, असंही कदाचित मुंबई हायकोर्टाला वाटणे स्वाभाविक ठरले असावे. दरम्यान, याबाबतचं निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे. पर्यायाने आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबर ऐवजी तो २१ डिसेंबरला लागला जाऊ शकतो, जवळ जवळ यावरच आज दुपारी शिक्कामोर्तब होईल असे दिसतेय.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment