लोकनेता न्यूज नेटवर्क
भोकर (माधव नागलवाड) :- रिठा येथील गंगाधर संगपवाड यांच्या आखाद्यावर बांधून ठेवलेल्या गाईस बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना काल रात्री घडली आहे.अशी घटना पुन्हा- पुन्हा होत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसापासून बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रिठा परिसरात एक दहशत निर्माण झाली आहे,त्यामुळे शेत शिवारात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, गुराखी,यांच्यात एक प्रकारची भीती निर्माण झाली.काही दिवसापूर्वी शेतातील आखाड्यावर बांधून ठेवलेल्या एका मागे एक अशा चार जणावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे या अश्या अचानच बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्याला शेतकरी भयभीत झाले आहेत. याचाच परिणाम शेतीवरील कामावर होत आहे.शेतातील कामासाठी मजूर मिळणासे झाले आहेत तरी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बिबट्याच्या वावरामुळे दिवसा जंगली प्राणी घुसून पिकाचे अतोनात नुसकान करत आहेत. व संद्याकाळी जंगली प्रयाण्याच्या शोदात बिबटया जंग लातून बाहेर पडून शेतकऱच्या अकाड्यावर आयत्ती शिकार करत आहे. व शेतकऱ्यासाठी रात्रीची थ्रीफेस लाईट असल्यामुळे शेतकरयाला संकटाचा सामना करावा लागत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment