लोकनेता न्यूज नेटवर्क
जिवती (सय्यद शब्बीर जागीदार) :- जिवती तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये १०० टक्के रोजगार हमी योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे (गट) चे कार्यकर्ते तथा सोरेकसा ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड यांच्या कडुन गटविकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले. जिवती तालुक्यातील शेतकरी कास्तकार मायबाप बेरोजगारी मुळे इतर राज्यात कामाकरीता स्थलांतर होतात तालुक्यात कुठलेही उद्योग नसल्याने हातबल होऊन मजबुरीने इतर ठिकाणी स्वतःच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना सोबत घेऊन कामाकरीता जावावे लागत आहे. भरपुर ठिकाणी घातपात पण नाकारता येत नाही पहिलेच अश्या घटना घडल्या आहे. म्हणून अश्या सर्व बाबी टाळण्याकरीता रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळते व बेरोजगारांच्या हाती काम मिळण्या करीता जिवती तालुक्यातील सर्व ३६ ही ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनेचे १०० टक्के काम राबवुन तालुक्यातील सर्व जनतेला गावस्तरावर रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावे करीता निवेदन देऊन चर्चा करण्यात आली या वेळी शिवसेना शिंदे (गट) चे जिवती तालुका संघटक गणेश पवार, संपर्क प्रमुख अरविंद चव्हाण, रामा आडे, ज्ञानेश्वर राठोड, आकाश जाधव, साईनाथ भालेराव, चिरंजीव सिंगारे आदीची उपस्थिती होती.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment