लोकनेता न्युज नेटवर्क
मुखेड (सुरेश जमदाडे) :- मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध डॉ. विजयकुमार मोरे यांनी व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय " एड्स समस्या आणि उपाय योजना " हा होता. एड्स हा सामाजिक विषय हाताळताना संवेदनशीलता जोपासणे आवश्यक आहे. समाजातील भीती, भेदभाव, अस्पृश्यता दूर झाली पाहिजे. प्रत्येक एड्स बाधित व्यक्तीला समाज त्याच्या सोबत असल्याची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. सकारात्मक भाव त्याला आयुर्मान वाढण्यास मदत करते असे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. अर्जुन गजमल, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजयकुमार मोरे, प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक प्रा. गणेश वायफणकर हे उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. चंद्रकांत एकलारे , सूत्रसंचालन रेड रिबन क्लब च्या कु. साक्षी चंदापुरे तर आभार प्रदर्शन कु. राजलक्ष्मी नातेवार हिने केले.यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करून कार्यक्रम सुरु करण्यात आला.
डॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधताना एड्स विषयी सामाजिक समतोल राखले पाहिजे. एड्स होण्याची कारणे कोणकोणती आहेत. कोणत्याही कारणाने एड्स झाल्यावर किंवा अगोदर कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. वायफणकर यांनी विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी बाळगली पाहिजे. चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गजमल यांनी महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना ही प्राचार्य डॉ. एस. बी. अडकीने यांच्या कल्पक नेतृत्वाखाली कार्यक्रम राबवत आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी जागरूक राहून सुदृढ भारत बनवणे गरजेचे आहे. एड्स सारखा आजार होऊ नये याकरिता काळजी घ्यावी असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बी. यु. गांजरे, प्रा.संजय स्वामी, प्रा.सुनील तमशेट्टे, प्रा. डॉ. एस. बी. गायकवाड, प्रा. मनोज साखरे, प्रा. विजय राठोड, प्रा. रवींद्र सोनुले, बालाजी चिवळे, देविदास आईनवाड, संभाजी दस्तुरे यांचे सहकार्य लाभले. बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन परिवार उपस्थित होता.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment