लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- कंधार, लोहा तालुका व सर्व नांदेड जिल्हयात सध्या थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाला दिवसा लाईट नाही म्हणून संध्याकाळी शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावे लागते .नांदेड जिल्हयातील बऱ्याच शेतकरी बांधवांना साप विंचू रानडुक्कर शेतकऱ्यावर हल्ला करत आहेत आणि सध्या बिबट्या ची चर्चा चालू आहे. शेतकरी बांधवानी अन्न पिकवले तरच हा देश चालू शकतो. शेती व शेतकरी बांधवांवर आपण सर्व अवलंबून आहोत.
तेव्हा शेतकरी बांधवांना एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये साप, विंचू, रानडुक्कर, कोल्हे या सर्वांचा सामना करावा लागतो आहे बरेच शेतकरी बांधव थंडीमध्ये काकडून तर काही साप विंचू रानडुक्कर यांनी हल्ला केल्यामुळे दवाखान्यात दाखल होत आहेत, त्यामुळे कंधार, लोहा व सर्व नांदेड जिल्हयातील शेतकरी बाधवांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा जेणेकरून शेतकयांना थंडीपासून व हिंसक प्राण्यांपासून बचाव करता येईल,तेव्हा आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल आणि होणान्या परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहाल असे निवेदनात शहाजी पाटील शिंदे यांनी महावितरण चे उप अभियंता कंधार यांना कळविले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment