सिंधी ता उमरी येथे ऊस विकास मार्गदर्शन मेळावा संपन्न



लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी (प्रतिनिधी) :- व्हि पी के उद्योग समूह आणि झायडेक्स इंडस्ट्रीज प्रा ली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सिंधी ता उमरी येथे ऊस विकास मार्गदर्शन मेळावा व्हि पी के उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री संदीप पाटील कवळे यांच्या आध्यक्षतेखाली पारपडला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ व्हि एस आय पुणे) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस लागवडीची पूर्व मशागत करणे,सरितील रुंदीचे महत्व,दोन डोळ्यातील अंतराचे महत्व या सह बेण्याची निवड,बीजप्रक्रिया,ऊस लागवडीच्या हंगामाची निवड,रासायनिक,जैविक व सेंद्रिय खताचे नियोजन,तनाचे नियंत्रण,उसाची बांधणी,पाण्याचे व्यवस्थापन या सह उसाचे संपूर्ण व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments