लोकनेता न्यूज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- कळका येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी यात्रेचे नियोजन योग्य प्रकारे करून श्री खंडेरायाच्या यात्रेच्या कुस्त्या मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या यात्रेमध्ये शेवटची कुस्ती किवळा येथिल पहेलवान अच्युत पाटील टर्के व लातूर येथील पैलवान यांची शेवटची कुस्ती १५००० हजार रुपयाची झाली. यावेळी यात्रा कमिटी नियोजन प्रमुख राजीव उत्तमराव पाटील गायकवाड (उपसरपंच प्रतिनिधी),विजय पाटील धोंडगे , गोविंदराव शिंदे गुरूजी,कैलास पाटील कदम जानापुरीकर, पंढरी पाटील कदम जानापुरीकर ,व्यंकटराव पाटील कळकेकर, भरत चिखलीकर , पांडुरंग शिवाजीराव पाटील कळकेकर ,गिरमाजी पाटील गायकवाड, अनिल पाटील गायकवाड , पोलिस कर्मचारी गिते साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह यात्रेत चोख बंदोबस्त ठेवून शांततेत खंडोबाची यात्रा संपन्न झाली आज गुरूवार रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून दत्त भक्तांच्या वतीने संपूर्ण गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे.दुपारी १२ वाजता गुलाल उधळून दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती राजीव पाटील गायकवाड यांनी दिली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment